Pimpri : ट्रेड बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्याची बारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ट्रेड बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्याची दिशाभूल करून 12 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक केल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2017 ते 2018 या कालावधीत पिंपरी येथे घडला.

राजेंद्र आनंदराव पाटील (वय 44, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनबा शिवाजी करपे (वय 36, रा. पिंपरीगाव), माधव विठ्ठल जाधव (वय 35, रा. चिंचवड), पंडित धोंडू माळी (वय 50, रा. भोसरी), मयूर अत्रे (वय 38, रा. बाणेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना ट्रेड बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यावरून फिर्यादी यांची दिशाभूल करून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 13 लाख 64 हजार 200 रुपयांची गुंतवणूक करून घेतली. त्यानंतर फिर्यादी यांना 1 लाख 50 हजार रुपये परत देऊन उर्वरित रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.