Pimpri : संक्रातीचे वाण म्हणून ‘सीएए’च्या समर्थनाची वाटली माहिती पुस्तिका

भाजपच्या वीणा सोनवलकर यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या मकर संक्रातीच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात नागरिकत्व सुधारणा कायद्याची सविस्तर माहिती असलेली पुस्तिका वाण म्हणून वाटली. सीएएच्या समर्थनार्थ भाजपच्या वीणा सोनवलकर यांनी हा अनोखा उपक्रम राबविला.

देशभरात सीएएच्या समर्थनार्थ आणि विरोधात मोर्चे काढले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या सोनवलकर यांनी सीएए विरोध आणि वास्तव या विषयाची संपुर्ण माहिती असलेली पुस्तीका वाटली आहे. नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा असून रद्द करण्यासाठी नाही. हा कायदा मुस्लिम समाजाविरोधात नाही.

नागरिकांमध्ये अनेक गैरसमज, संभ्रम निर्माण झाला आहे. महिलांचा संभ्रम दूर करणे, समाजात या कायद्याविषयी जागृती निर्माण करणे. महिलेच्या माध्यमातून घराघरात याबाबतची माहिती पोहचविण्यासाठी वाण म्हणून ही पुस्तिका दिल्याचे सोनवलकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.