Sangvi : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन गावठी कट्टे जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

वसीम शफिकोद्दीन मणियार (वय 25, रा. जुनी सांगवी), अनिकेत उर्फ सोन्या अशोक बाराते (वय 21, रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई हेमंतकुमार प्रकाश गुत्तिकोंडा यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक व चंद्रकांत भिसे यांना माहिती मिळाली की ममता नगर जुनी सांगवी येथील दत्ताश्रम शेजारी दोन संशयित इसम थांबले आहेत. त्यांच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून वसीम आणि अनिकेत या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.