Pimpri: ‘हातात खडू, पेन, पुस्तकांऐवजी प्रशासन चो-या करण्यास भाग पाडतेय’, एका शिक्षकाची भावना

शिक्षकपदाला मान्यता मिळत नसल्याने उपोषणाला बसलेल्या शिक्षकाची उद्विग्न प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – हातात खडू, पेन, पुस्तकांच्याऐवजी चाकू आणि तलवार घेऊन चोऱ्या, लुटमार करण्यास प्रशासन भाग पाडत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया गणेश शिंदे या शिक्षकाने दिली आहे. प्रशासनाकडून शिक्षकपदाला मान्यता मिळत नसल्यामुळे गणेश शिंदे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून न्यायालयाच्या अवमानाचा केल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिक्षकपदाला मान्यता मिळत नसल्याने शिक्षक गणेश शिंदे यांच्यावर उपोषणाची वेळ आली आहे. पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शिंदे यांनी आज (गुरुवार) पासून उपोषण सुरु केले आहे. 8 ते 9 वर्षांपासून न्यायालय, शिक्षण मंडळ, जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभाग असा नित्य संघर्ष शिंदे यांचा सुरू आहे. गणेश यांची खिंवसरा पाटील विद्यामंदिर येथे अनुसूचित जातीचा अनुशेष रिक्त असल्यामुळे 14 जानेवारी 2011 रोजी शिक्षण सेवक या पदावर नेमणूक झाली होती. परंतु, आजपर्यंत या अनुशेषाच्या पदाला शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.