Moshi : देवपूजा करून देवाची गाणी लावून त्याने केली आत्महत्या

एमपीसी न्यूज – शेतातील देवाची पूजा करून तसेच देवाची गाणी लावून एकाने गळफास घेतला. ही घटना मोशी येथे गुरुवारी (दि. 30) सकाळी घडली.

संदीप चिनकु आल्हाट (वय 43, रा. जुना आळंदी रोड, आल्हाट वस्ती, मोशी) असे गळफास घेतलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

मयत संदीप यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हे सकाळी आठ वाजताच्या सुमारास घरातून शेतात जाण्यासाठी निघाले. शेतात जाऊन त्यांनी मुंजोबा देवाची पूजा केली. त्यानंतर मोबाईलवर देवाची गाणी लावत जवळच असलेल्या झाडाला गळफास घेतला. सकाळी दहा वाजताच्या सुमारास संदीप यांचा भाऊ शेतात गेला असता हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत संदीप यांच्या मागे आई, वडील , पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.