Chakan : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते ‘योगेश सिल्क’ वस्त्रदालनाचे दिमाखदार उदघाटन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- कासारवाडी आणि आकुर्डी येथील भव्य वस्त्रदालनांच्या अफाट लोकप्रियतेनंतर चाकण परिसरातील ग्राहकांच्या सेवेसाठी ‘योगेश सिल्क’ या नवीन भव्य, प्रशस्त वस्त्रदालनाचे उदघाटन बुधवारी (दि. 29) सुप्रसिद्ध अभिनेत्री ‘अप्सरा’फेम सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते करण्यात आले. चाकणकरांना लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी पुण्यात आणि येवल्यात जाण्याची आता गरज भासणार नसून एकाच छताखाली बस्ता खरेदी करता येणार आहे.

चाकण बाजारपेठेत शिवाजी विद्यामंदिराच्या समोर ‘पृथ्वीप्रस्थ’ या व्यापारी संकुलात ‘योगेश सिल्क’ हे भव्य वस्त्रदालन सुरू करण्यात आले आहे. उदघाटनाची कार्यक्रमासाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे ‘योगेश सिल्क’ची लोकप्रियता चाकणपर्यंत पोहोचल्याची प्रचिती आली.

उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आर. जे. अक्षय घोळवे यांनी ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी स्पर्धात्मक मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला. यातील प्रथम पाच विजेत्या महिलांना ‘योगेश सिल्क’च्या वतीने खास पैठणी तसेच ३ पैंजण व १ सोन्याची नथ देऊन गौरवण्यात आले. एका ६५ वर्षाच्या आजीनी या खेळात भाग घेऊन सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते त्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना ‘लकी ड्रॉ’द्वारे आकर्षक भेटवस्तूही देण्यात आली. सोनाली कुलकर्णी हिने ‘अप्सरा आली’ या गाण्यावर नृत्य सादर केले. तसेच धुरळा, हिरकणी या तिच्या नव्या चित्रपटातील संवाद सादर करून उपस्थितांना खुश केले. सोनाली कुलकर्णी हिने या ठिकाणी मनसोक्त कापड खरेदीचा देखील आनंद लुटला. यावेळी योगेश अग्रवाल यांनी सोनाली कुलकर्णी हिला पैठणी सप्रेम भेट दिली.

पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी आणि आकुर्डी येथील भव्य वस्त्रदालनांच्या अफाट लोकप्रियतेनंतर अग्रगण्य असलेल्या ‘योगेश सिल्क’ने चाकण परिसरातील ग्राहकांच्या मागणीनुसार चाकण बाजारपेठत भव्य वस्त्रदालन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ५००० स्क्वेअर फूट अशा प्रशस्त जागेमध्ये सुरु झालेल्या या वस्त्रदालनामध्ये अत्यंत दर्जेदार, आकर्षक तसेच कलात्मक साड्या व कपड्यांचे असंख्य प्रकार व ते देखील माफक किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे ‘योगेश सिल्क’ला ग्राहकांकडून अल्पावधीतच पसंती मिळत आहे. कांजीवरम, गढवाल, बनारसी शालू, महिलांच्या पारंपरिक साड्या, पैठण्या, डिझाइनर साड्या, ड्रेस मटेरियल, आकर्षक पंजाबी ड्रेस, विवाह प्रसंगी घालण्याचे घागरा ओढणी, तसेच कपड्याच्या विविध प्रकारच्या असंख्य व्हरायटीज या ठिकाणी पाहायला मिळतात.

त्याचप्रमाणे पुरुषांसाठी रेड अँड टेलर, रेमंड, बिर्ला, सियाराम अशा नामांकित कंपन्यांचे सूटींग-शर्टिंगचे कापड तसेच ब्लेझर, जोधपुरी, शेरवानी देखील उपलब्ध असून त्यावरील कपड्यांची शिलाई तीन महिन्यांसाठी ‘फ्री’ ठेवण्यात आली आहे. विविध प्रकारच्या कपड्यावर ३० ते ५० टक्के डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. त्याशिवाय ‘योगेश सिल्क’ वस्त्रदालनाची जाहिरात किंवा बातमीचे पेपर कटिंग घेऊन येणाऱ्यास अतिरिक्त ५ टक्के डिस्काउंट देखील दिला जाणार आहे. उत्पादकाकडून थेट ग्राहकांपर्यंत साड्या, पैठणी व अन्य कपडे पोचविण्यात येत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि पैसे वाचतो. अशी माहिती ‘योगेश सिल्क’चे संचालक योगेश अग्रवाल यांनी दिली.

‘योगेश सिल्क’च्या चाकण येथील वस्त्रदालनाला भेट देऊन वस्त्रखरेदीचा खरा आनंद सर्वांनी अनुभवावा, असे आवाहन मोतीराम रामदयाल अग्रवाल, योगेश मोतीराम अग्रवाल, अमित मोतीराम अग्रवाल, पिंपरी महापालिकेचे माजी शहर अभियंता शांताराम गराडे व परिवाराकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.