BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ज़िल्हास्तरीय कराटे कुमीते स्पर्धेत विश्वास स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- युनिव्हर्सल शोतोकान कराटे असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज़िल्हास्तरीय कराटे कुमीते स्पर्धेत विश्वास स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. रावेत येथील निवृत्ती लॉन्स येथे नुकतीच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 1200 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये विश्वास स्पोर्ट्स क्लबचे 23 खेळाडू सहभागी झाले होते.

येल्लो ब्राउन बेल्ट गटातून अमेय अमित शेगुणशी याने कांस्यपदक तर रितेश अविनाश होसदोड्डे याने रौप्यपदक पटकाविले. या खेळाडूंना एनआयएस प्रशिक्षक विश्वास मोहिते, नवनाथ नवघणे तसेच सहायक प्रशिक्षक मनोज सोनकांबळे ,सचिन मोहिते आणि अमित वर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.

कराटे कुमीते प्रकारात इतर गटातून विजय प्राप्त केलेले खेळाडू

ब्राउनबेल्ट – अनिश राव (कांस्यपदक)
ब्लूबेल्ट – वरद सुधीर तरटे (सुवर्णपदक), तन्मय शाम वासू (कांस्यपदक)
ऑरेंजबेल्ट –अथर्व गाढवे (कांस्यपदक)
येल्लोबेल्ट – पार्थ मोरेश्वर राऊत (सुवर्णपदक), अरुल राज पिल्ले (रौप्यपदक)

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like