Pimpri: शहरवासीयांच्या तोंडचे पाणी महागणार ! पाणीपट्टीत होणार दरवाढ

एमपीसी न्यूज – धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवडकरांना हिवाळ्यापासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत असताना आता पाणीपट्टीत वाढ केली जाणार आहे. सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत दिले जाणार असून सहा ते 15 हजार लिटरसाठी आठ रुपये, 15 ते 20 हजार लिटरपर्यंत 40 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. 20 हजार लिटरपुढील वापरासाठी 100 रुपये पाणीपट्टी दर प्रस्तावित करण्यात आला आहे. व्यापारी पाणीवापरासाठीचा दर 55 रुपये निश्चित करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

महापालिकेने 20 एप्रिल 2018 मध्ये पाणीपट्टी दरामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार पाणीपट्टी आकारण्यात येते. सद्यस्थितीत शहरात पाण्याचे समन्यायी पद्धतीने वाटप करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तथापी, प्रत्येक नळजोडावरील पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. उतारावरील भागात जास्त पाणी उपलब्ध होते. त्यामुळे तेथे मानकापेक्षा जास्त पाणी वापर करण्याची प्रवृत्ती दिसते. उंचावरील भागात पाण्याचा तुटवडा जाणवतो. समन्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी 100 एलपीसीडी पेक्षा जास्त पाणीवापर करणा-या ग्राहकांवर वचक ठेवण्यासाठी जास्त दर लावण्यात येणार आहेत. याचा विचार करुन पाणीपट्टीचे सुधारित दर प्रस्तावित केले आहे. तसेच दरवर्षी सर्व प्रकारच्या दरांमध्ये वार्षिक पाच टक्के वाढ प्रस्तावित करण्याचे सुचविले आहे.

सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत दिले जाणार असून सहा ते 15 हजार लिटरसाठी आठ रुपये आणि 15 ते 20 हजार लिटरपर्यंत 40 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. 20 हजार लिटरपुढील वापरासाठी 100 रुपये पाणीपट्टी दर प्रस्तावित करण्यात आला आहे. 20 हजार लिटरपुढील वापरासाठी 100 रुपये पाणीपट्टी दर प्रस्तावित करण्यात आला आहे. व्यापारी पाणीवापरासाठीचा दर 55 रुपये असणार आहे.

खासगी शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, शासकीय, निमशासकीय कार्यालये. रेल्वे स्टेशन, ईएसआयसी हॉस्पिटल, ऑटो क्ल्स्टर, औंध उरो रुग्णालयांना प्रति हजार लिटरसाठी 17 रुपये सुचविले आहेत. धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृध्दाश्रमांना 11 रुपये, स्टेडीयम 22 रुपये, महापालिका इमारती, मिळकतींना 11 रुपये, देहुरोड कँन्टोन्मेंट बोर्डासाठी प्रति हजार लिटरसाठी 11 रुपये दरवाढ सुचविली आहे. पुढील 2020-21 या आर्थिक वर्षात नवीन दरवाढ होणार आहे.

झोपडपट्टीसाठीचे नवीन धोरण

सहा हजार लिटरपर्यंत मोफत, 6001 ते 15 हजारसाठी 4 रुपये, 15001 ते 20 हजार लीटरसाठई 40 रुपये आणि 20 हजारच्या पुढील पाणीवापरणा-यांना 100 रुपये दर सुचविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like