Lonavala : ट्रेकींग पलटनची ढाक बहिरीवर स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे रविवारी (दि 02) ट्रेकींग पलटनच्या 37 व्या मोहिमेत थरारक ढाक बहिरी ट्रेकमार्गावर स्वच्छता मोहीम राबवून या मार्गावरील प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला.

कोंडेश्वरपासून थरारक ढाकबहिरीच्या ट्रेकमार्गावर कँपर्स तसेच पर्यटकांनी निष्काळजीपणे टाकून दिलेल्या थर्माकोल प्लेटस, प्लास्टिक बाटल्या, रेडीफूड पँकेट्स, शीतपेय व दारूच्या बाटल्या, ट्रेकींग पलटनच्या सदस्यांनी उचलून परिसर प्लास्टिकमुक्त केला.

या परिसरात ठिकठिकाणी स्वयंपाकासाठी केलेल्या दगडी चुली, स्वयंपाकचे साहित्य, दारूच्या बाटल्या बघून या जंगलाच्या परिसरात ब-याच पार्टया होतात हे लक्षात आले.

ट्रेकींग पलटनच्या या स्वच्छता मोहिमेत संदीप चौधरी, विलास करपे, अमोल गोरे, पवन पाटील, ललित बागल, सुजित गायकवाड, साईनाथ जगदाळे आणि डॉ सुरेश इसावे या ट्रेकर्सनी योगदान दिले. नियोजनात कामशेत येथील श्री हनमंत घोडके यांनी मोलाची मदत केली. तसेच प्रा.डॉ. संदीप गाडेकर यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.