Lonavala : मावळ तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी नवनाथ देशमुख

पुणे जिल्हा संचालकपदी विजय कचरे

एमपीसी न्यूज- मावळ तालुका अध्यक्षपदी देवघर शाळेतील नवनाथ देशमुख यांची तर पुणे जिल्हा संघाच्या संचालकपदी विजय कचरे यांची निवड जाहीर करण्यात आली.

पुणे जिल्हा ग्रंथालय संघाची निवडणूक पुणे जिल्हा अध्यक्ष मार्कंड्य मिठापल्ली यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या सभेत ग्रंथालय संघाचे कार्यवाह सोपान पवार यांनी ही निवड घोषित केली.

यावेळी संघाचे माजी अध्यक्ष धोंडिबा सुतार, विजय कोलते, चंद्रशेखर कपाते, काका चव्हाण, रमेश सुतार व सर्व सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.