Pimpri : करण गायकवाड याची आंतराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या करण गायकवाड याची दिल्ली येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

करणगायकवाड हा रहाटणी मधील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुलांच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. ९ फेब्रुवारी ते १३ फेरुवारी दरम्यान दिल्ली येथे या स्पर्धा होणार आहेत. या निवडीबद्दल महापौर माई ढोरे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती निर्मला कुटे व नगरसेविका आरती चौंधे उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.