Talegaon Dabhade : जिल्हास्तरीय नाटयस्पर्धेत सरस्वती विद्या मंदिर प्रथम

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषद आयोजित नाट्य स्पर्धेत सरस्वती विद्या मंदिरच्या माध्यमिक विभागाचा मराठी भाषा मुलींच्या गटात ‘काकूंचा वाढदिवस’ या नाटकाला तालुका व जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, शिक्षणाधिकारी डॉ मोरे, निरंतरचे शिक्षणाधिकारी हरून अत्तार, उपशिक्षणाधिकारी राक्षे सर, संध्या गायकवाड आदी उपस्थित होते. शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका रेखा परदेशी, पर्यवेक्षिका सुरेखा रासकर, सुनीता कुलकर्णी, कल्याणी जोशी, सहभागी विद्यार्थी व विनोद आगळे यांनी पारितोषिक स्वीकारले.

सदर नाटकास सुनीता कुलकर्णी व कल्याणी जोशी यांनी मार्गदर्शन केले. संगीत साथ सलील कुलकर्णी यांनी केली. या नाटकासाठी सुनीता कुलकर्णी यांना दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. समा भावसार, कल्याणी कुलकर्णी यांना अभिनयाचे पारितोषिक मिळाले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.