Lonavala : सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या 21 महाविद्यालयांचा पदवीग्रहण समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज- सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या  21 महाविद्यालयांचा पदवीग्रहण समारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वा. रामानंदतीर्थ नांदेड लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ.एस बी.निमसे, गेस्ट ऑफ ऑनर कॉग्निझन्टचे उपाध्यक्ष संदीप राणे यांच्यासह संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष रोहित नवले, रचना नवले-अष्टेकर, सदस्य जी.के. शहाणी हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. निमसे यांनी थ्री एल- लाईफ- लाँग- लर्निग व थ्री- ए अंबिशन- एनी टाईम – एनी व्हेअर या सूत्रांची तरुण स्नातकांसाठी गरज असल्याचे सांगितले. त्याबरोबर आपल्या भारतीय उपखंडामध्ये भारतीय प्रयोगशाळेमध्ये कार्यरत राहून एकही नोबेल शास्त्रज्ञ निर्माण करू शकलो नाही तसेच आपण पहिल्या शंभर रँकिंगमध्ये नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. आता आलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा वापर समाजहितासाठी होण्याची गरज व्यक्त केली.

या पदवीग्रहण समारंभ मध्ये सिंहगडच्या 21 महाविद्यालयांमधील अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, आर्ट, सायन्स, कॉमर्स व मॅनेजमेंट अशा विविध विद्या शाखांमधील स्नातकांना एकूण 7478 पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष नवले यांनी संस्थेच्या वाटचालीचा आलेख शब्दरुपाने मांडला.

सूत्रसंचालन प्रा. वृषाली राऊत व यशश्री जाखडे यांनी केले तर डॉ. माणिक गायकवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.