Talegaon Dabhade : शं. वा.परांजपे बालनाट्य स्पर्धेत ज्ञान प्रबोधिनी व सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलचे यश

एमपीसी न्यूज- कलापिनी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कै.डॉ. शं. वा.परांजपे स्मृती बालनाट्य स्पर्धेमध्ये निगडीच्या ज्ञान प्रबोधिनी विद्यालय व सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेचे हे 42 वे वर्ष होते.

या स्पर्धांचे पारितोषिक वितरण तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी शिक्षण मंडळ सभापती बिजेंद्र किल्लावाला व किरण किल्लावाला यांचे हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर कलापिनीचे समन्वयक विनायक भालेराव, स्पर्धा प्रमुख अशोक बकरे उपस्थित होते.

परीक्षकांनी आपल्या मनोगतात कलाकारांच्या गुणवत्ते बद्दल समाधान व्यक्त केले व प्रसंगनाट्य स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळत असल्याने ही स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे असे मनोगत व्यक्त केले. बिजेंद्र किल्लावाला यांनी गेली 42 वर्षे या स्पर्धा सातत्याने चालू असल्या बद्दल संस्थेचे कौतुक केले.

प्राथमिक विभागात 11 व माध्यमिक विभागात 10 संघ सहभागी झाले होते. माध्यमिक विभागासाठी प्रसंग नाट्य कार्यशाळा आणि स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विभागाचे परीक्षण ज्योती गोखले, रुद्राणी नाईक आणि वैशाली गाडगीळ यांनी केले तर प्रसंग नाट्य स्पर्धेचे परीक्षण प्रसाद पानसे, श्रीधर कुलकर्णी व विद्या मुळे यांनी केले.

प्रसंगनाट्य कार्यशाळेचे संचालन आणि प्रशिक्षण श्रीधर कुलकर्णी, प्रतीक मेहता, चेतन पंडित, शार्दुल गद्रे, आदित्य धामणकर, विनया केसकर या कलापिनीच्या युवा कलाकारांनी केले. माध्यमिक विभागाचे परीक्षण ज्योती गोखले, गोविंद जेस्ते आणि कल्पना गजरे यांनी केले.

कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. मकरंद जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अशोक बकरे, जितेंद्र पटेल, ह्रतिक पाटील, मुकुंद इनामदार, रश्मी पांढरे, विनायक काळे, चेतन पंडित, आदित्य धामणकर, शार्दुल गद्रे आणि प्रतीक मेहता यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल

प्राथमिक विभाग

सांघिक

प्रथम – सह्याद्री इंग्‍लीश मिडीयम स्‍कूल (भाज्यांची गंम्मत)

द्वितीय – सरस्‍वती विद्यामंदिर, तळेगाव (गाणारा मुलुख)

तृतीय – आदर्श विद्यामंदिर, तळेगाव (एकमेका सहाय्य करू)

उत्तेजनार्थ – जैन इंग्‍लीश स्‍कूल- (हँडवाश)

उत्तेजनार्थ –डी.आय.सीज इंग्लिश स्कुल निगडी (भातुकली)

ग्रामीण प्रोत्साहन – सरस्‍वती विद्यामंदिर, इंदोरी (ढग रंगीत झाले)

लक्षवेधी प्रयत्न – बा.जैन संघ प्राथमिक विद्यालय (नवस)

दिग्‍दर्शन

प्रथम – सौ.कामिनी जोशी – सह्याद्री इंग्‍लीश मिडीयम स्‍कूल (भाज्यांची गंम्मत)

द्वितीय – सौ.सोनल शेटे – सरस्‍वती विद्यामंदिर, तळेगाव (गाणारा मुलुख)

तृतीय – वर्षा गायकवाड आदर्श विद्यामंदिर, तळेगाव (एकमेका सहाय्य करू)

लेखन

प्रथम – कौमुदी जोशी – सह्याद्री इंग्‍लीश मिडीयम स्‍कूल (भाज्यांची गंम्मत)

द्वितीय – स्वप्नाली व्हावळ, जैन इंग्‍लीश स्‍कूल- (हँडवाश)

संगीत/पार्श्वसंगीत

जैन इंग्‍लीश स्‍कूल- (हँडवाश)

संगीतसाथ

सरस्‍वती विद्यामंदिर, इंदोरी.(ढग रंगीत झाले)

रंगमंच रचना

पैसाफंड प्रा. शाळा(शून्याची किंमत)

रंगभूषा / वेशभूषा

सह्याद्री इंग्‍लीश मिडीयम स्‍कूल (भाज्यांची गंम्मत)

अभिनय – मुले

प्रथम – अथर्व ढोरे

द्वितीय – सार्थक चौगुले

तृतीय – नैतिक माळी

उत्तेजनार्थ – अर्पित चव्हाण ,अर्णव सलागरे ,पुष्कराज जोशी

लक्षवेधी बालकलाकार – संस्कार धावणे

अभिनय – मुली

प्रथम – श्रेया साळुंके

द्वितीय – ख़ुशी माने

तृतीय – सौम्या सामंत.

उत्तेजनार्थ – अक्षरा भेगडे, अनुष्का तरडे, पलक पाटील,.

लक्षवेधी बालिका कलाकार – शौर्या गदादे

माध्यमिक विभाग

सांघिक

प्रथम – ज्ञान प्रबोधिनी नव नगर विद्यालय निगडी (श..श..शाळा हश्शा हुश्शा)

द्वितीय – जैन इंग्‍लीश स्‍कूल, तळेगाव (चालीन तितक्या वाटा गं)

तृतीय – इंद्रायणी इंग्लिश स्कुल,तळेगाव (काळ नगरीची सफर)

उत्तेजनार्थ – सरस्‍वती विद्यामंदिर तळेगाव (काकूंचा वाढदिवस)

उत्तेजनार्थ –कृष्णराव भेगडे स्कुल,तळेगाव (मनू माझा भावला )

लक्षवेधी प्रयत्न – सह्याद्री इंग्‍लीश मिडीयम स्‍कूल (क्षणभर विसावा)

प्रसंग नाट्य

प्रथम – सरस्‍वती विद्यामंदिर तळेगाव (फजिती )

द्वितीय – मॉडर्न हायस्कूल निगडी (बंड केले मुलांनी)

तृतीय – रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन,तळेगाव (जादूचा आरसा)

उत्तेजनार्थ – इंद्रायणी इंग्लिश स्कुल,तळेगाव (स्वप्नातील शाळा)

उत्तेजनार्थ – ज्ञान प्रबोधिनी नव नगर विद्यालय निगडी (फजिती)

दिग्‍दर्शन

प्रथम – सौ.मानसी फाटक/मयुरी जेजुरीकर -( श..श..शाळा हश्शा हुश्शा)

द्वितीय – सौ.अनघा कुलकर्णी – (चालीन तितक्या वाटा गं)

तृतीय – स्मितल रहाळकर (काळ नगरीची सफर)

लेखन

प्रथम – सौ.अनघा कुलकर्णी – (चालीन तितक्या वाटा गं)

द्वितीय – अक्षय आगाशे -( श..श..शाळा हश्शा हुश्शा)

संगीत/पार्श्वसंगीत

ज्ञान प्रबोधिनी नव नगर विद्यालय निगडी (श..श..शाळा हश्शा हुश्शा)

रंगमंच रचना

जैन इंग्‍लीश स्‍कूल, तळेगाव (चालीन तितक्या वाटा गं)

रंगभूषा / वेशभूषा

इंद्रायणी इंग्लिश स्कुल,तळेगाव (काळ नगरीची सफर)

अभिनय – मुले

प्रथम – प्रणव धर्माधिकारी

द्वितीय – साईराज सावळे

तृतीय – पूर्वेश जोशी

उत्तेजनार्थ – सिद्धार्थ काकडे, अथर्व भूते

अभिनय – मुली

प्रथम – तनिष्का कोरडे

द्वितीय – सायली कदम

तृतीय – परिणीता शिंदे.

उत्तेजनार्थ – धनश्री दाभाडे, तनया जगदाळे,ऐश्वर्या पोवार,वैष्णवी आंभोरे.

लक्षवेधी कलाकार – गितीका सुतार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like