Chinchwad : श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा देव

एमपीसी न्यूज – चिंचवड शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान संचालित श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा देव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा अर्चना तोंडकर यांनी पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, राजू गुणवंत, हरिनारायण शेळके, संतोष शेळके, मंगेश पाटील, शरण अवसेकर, प्रकाश शिंदे, मधुकर खर्चे, शोभा नलगे, नलिनी खडके, सुनीता दळवी हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like