Pimpri : ‘कोरोना व्हायरस’च्या दक्षेतसाठी ‘वायसीएमएच’मध्ये अतिदक्षता कक्ष

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसच्या दक्षतेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अतिदक्षता कक्ष सुरु केला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये तातडीने संशयीत कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वायसीएमएचचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले आहे. भारतात देखील हा व्हायरस दाखल होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात असंख्य नागरिक बाहेरून दाखल होत असतात. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये नवीन कोरोना विषाणू रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष तत्काळ स्थापन करावा. तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना त्वरित राबविण्याची विनंती नगरसेवकांकडून केली जात होती.

त्यानुसार महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयामध्ये संशयित कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like