Nigdi : पादचारी महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाचे मंगळसूत्र हिसकावले

0

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 12) सायंकाळी सात वाजता संभाजीनगर येथे घडली.

शीला विश्वनाथ स्वामी (वायू 57, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील अनोळखी दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शीला बुधवारी रात्री सात वाजता संभाजीनगर मधील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम केंद्रासमोरून पायी चालत जात होत्या. त्यावेळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी शीला यांच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किमतीचे 43 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like