Ravet : लग्नास नकार दिल्याने 50 लाखांची मागणी करत तरुणीला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – लग्नासाठी तरुणीने नकार दिल्याने तिच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 11 ऑगस्ट 2019 रोजी रावेत येथे घडला आहे. याप्रकरणी तरुणीच्या दूरच्या नात्यातील एका तरुणावर 13 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल अशोक कापसे (वय 25, रा. भिकारनगर, ता. जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादी तरुणीच्या दूरचा नातेवाईक आहे. त्याने 2018 ते 2019 असे वर्षभर फिर्यादी तरुणीला रावेत येथे ठिकठिकाणी जाऊन लग्नाची मागणी घातली. त्यासाठी तरुणीने नकार दिला. तरुणीने नकार दिल्यानंतर निखिल तिला मारहाण करून दमदाटी आणि धमकी देऊ लागला. 11 ऑगस्ट रोजी त्याने तरुणीशी गैरकृत्य करत तिच्याकडे 50 लाख रुपये वडिलांकडून घेऊन येण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीने 13 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.