BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : भाडेकरूच्या परवानगी शिवाय सामान बाहेर काढल्याप्रकरणी घरमालकावर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – भाडेकरूचे सामान भाडेकरूच्या परवानगीशिवाय घराचे कुलूप तोडून बाहेर काढल्याप्रकरणी घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी साडेतीन वाजता निगडी प्राधिकरण येथे सेक्टर क्रमांक 27 मध्ये घडली.

अनंत पुंडलिक बागडे (वय 45) असे गुन्हा दाखल झालेल्या घरमालकाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश चंद्रशेखर नाईक (वय 28, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश हे आरोपी बागडे यांच्या निगडी प्राधिकरण मधील सेक्टर क्रमांक 27 येथील घरात राहतात. आकाश हे व्यवसाय करत असून बुधवारी ते घराबाहेर असताना आरोपी घरमालकाने आकाश भाड्याने राहत असलेल्या घराचे कुलूप तोडले. आकाश यांना पूर्वकल्पना न देता त्यांचे साहित्य बाहेर काढले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like