Chinchwad : वंडरलँड स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव साजरा

एमपीसी न्यूज- ओम प्रतिष्ठान संचलित वंडरलँड स्कूलमध्ये दि. 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सीए परितोष पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या क्रीडा महोत्सवात यामध्ये फनी बनी रॅबिट, बॅलन्सिंग गेम, सॅक रेस, बलून ब्लास्ट, फील द बाॅटल अशा खेळाचा मुलांनी आनंद घेतला. या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालकांसाठी सूर्यनमस्कार व योगासने ‌याची कार्यशाळा घेण्यात आली. क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. उपस्थित मान्यवरांनी मुलांना खेळाचे आणि व्यायामाचे महत्व सांगितले. खेळामुळे मित्रत्वाची, एकजुटीची, सांघिक भावना विकसित होते असे त्यांनी सांगितले.

खेळामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या हेतूने वंडरलड टीमतर्फे या क्रीडा महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन भारती पवार यांनी केले. वनीता सावंत यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वंडरलँड स्कूलच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.