Chinchwad: ‘व्हॅलेंटाईन डे’ला एनआयबीआरमध्ये ‘पुस्तक प्रेम दिवस’

0

एमपीसी न्यूज – संपूर्ण जग प्रेमदिवस साजरा करत असताना ‘व्हॅलेंटाईन डे’ला चिंचवड येथील एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी ‘पुस्तक प्रेम दिवस’ साजरा करत अनोखा संदेश दिला.

या कार्यक्रमात कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे व प्राचार्य वैभव फंड उपस्थित होते.

प्रदीप निफाडकर म्हणाले, “गझलांचे रसग्रहण प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. आयुष्य सुंदर आहे. ते अजून सुंदर व अर्थपूर्ण बनवण्याकरिता आपल्या भोवताली असणारी माणसं, साहित्य, निसर्ग यातील सकारात्मक गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे. देश विदेशातील कवी- लेखकांचे साहित्यवाचन जबाबदार, कर्तव्यनिष्ठ माणूस घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे. विद्यार्थीदशेत अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास उर्वरित आयुष्य आनंदात व्यतित करता येईल”

सामाजिक भान जागृत करण्यात साहित्याचा भरीव वाटा आहे. प्रेम करा, पण समाजातील जातीयता संपविण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला हवा. प्रेमाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या दुर्लक्षित करू नका. असे विविध मंत्र विद्यार्थ्यांना प्रदीप निफाडकर यांनी आपल्या विविध गझलांच्या सादरीकरणातून दिले.

“जेव्हा मला काही लिहावे वाटते, प्रत्येक शब्दाला नटावे वाटते, संपूर्ण ज्यांनी देश नाही पाहिला, त्यांनाच परदेशात जावे वाटते”, “जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी” अशा अनेक सुंदर आणि भावपूर्ण गझला सादर करून त्यांनी सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुखदा कुलकर्णी यांनी केले. तर आभार प्रा. सतीश ब्राह्मणे यांनी मानले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like