Mulshi : घनकचरा व्यवस्थापन नसल्याने नेरेगावात कचऱ्याचे साम्राज्य

एमपीसी न्यूज – शासकीय अनुदान मिळूनही घनकचरा व्यवस्थापन नसल्यामुळे मुळशी तालुक्यातील नेरे गावात मागील दोन ते तीन महिन्यांपासून ओला व सुका कचरा तसाच पडून आहे. त्यामुळे हा कचरा पडून दुर्गंधी पसरली आहे, अशी माहिती नेरेगावचे रहिवासी जनार्दन पायगुडे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या वित्त आयोगाकडून नेरे ग्रामपंचायतीला अनुदानाद्वारे कोरडा कचरा साठवण्यासाठी घंटागाडी व ड्रम दिले होते. ग्रामपंचायतीने नेरे गावठाण व दत्तवाडी येथील देवळे येथे तो कचरा रोज व्यवस्थित टाकण्याची जबाबदारी आदर्श ग्रामपंचायत नेरे ग्रामसेवक नांदगुडे यांची असल्याचे पायगुडे यांनी सांगितले. त्यांनी ती व्यवस्था केली नाही म्हणून तो ओला व सुका कचरा मागील 2 ते 3 महिने तसाच पडून आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे गावातील रहिवासी हैराण झालेले आहेत. या दुर्गंधीमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत नेरे गावातील रहिवासी जनार्दन पायगुडे यांनी वारंवार ग्रामसेवक यांना फोन करून समक्ष भेटुन कचऱ्याची व्यवस्था लावण्याची विनंती केली. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे पायगुडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.