Chinchwad : आरटीई ऑनलाईन प्रोसेसचे केंद्र सुरु

एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगर व टायगर ग्रुप महिला आघाडी (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने आरटीई अंतर्गत फॉर्म भरण्यापासून ते स्कुलमध्ये अॅडमिशन मिळेपर्यंत मोफत मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे.

चिंचवड, शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. शाळा प्रवेशाचे ऑनलाईन फॉर्म भरताना नागरिकांना अडचणी येतात. त्यामुळे फॉर्म भरण्यापासून ते अॅडमिशन मिळेपर्यंतचे मोफत मार्गदर्शन या केंद्रात केले जाणार आहे. परिसरातील गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले आहे.

या केंद्राचे आयोजन टायगर ग्रुप महिला आघाडी (महाराष्ट्र) यांनी केले आहे. त्यासाठी राहुल शिंदे, मंगेश पाटील, अश्विनी राहुल शिंदे, अर्चना तोंडकर, रेखा विनीत साळी, समिना लतीफ बेग यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.