Maval : संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलचा मोठा विजय

बंडखोरांचा सलग दुसऱ्यांदा पराभव

तळेगाव दाभाडे- श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा तथा नाना नवले यांच्याकडेच पुन्हा एकहाती सत्ता दिली. त्यांच्या सर्व गटाचे उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालकांच्या निवडणुकीत तीन उमेदवार याआधीच बिनविरोध विजयी झाले होते. उर्वरित 18 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात राहिले होते. रविवारी (दि. १६) 18 जागांसाठी 53 टक्के मतदान झाले. सोमवारी (दि. १७) वाकड येथे मतमोजणी झाली. त्यामध्ये माजी खासदार व कारखान्याचे संस्थापक नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

झालेले मतदान व गटाप्रमाणे विजयी उमेदवार

हिंजवडी – ताथवडे गट

नानासाहेब नवले – 9974
बाळासाहेब बावकर – 9421
पांडूरंग राक्षे- 1177 (पराभुत)
बाळासाहेब विनोदे- 9090

पौड- पिरंगुट गट

अंकुश उभे – 9438
दिलीप दगडे – 9401
महादेव दुडे – 8679
संग्राम मोहोळ – 2337 (पराभुत)

तळेगाव- वडगाव गट

बापुसाहेब भेगडे – 9192
माऊली दाभाडे – 9132
शिवाजी पवार – 9109
बाळासाहेब नेवाळे – 1415 (पराभुत)
तुकाराम नाणेकर – 824 ( पराभुत)
पंढरीनाथ ढोरे – 831 (पराभुत )

सोमाटणे – पवनानगर गट

नरेंद्र ठाकर – बिनविरोध
शामराव राक्षे – बिनविरोध
सुभाष राक्षे- बिनविरोध

खेड- हवेली- शिरूर गट

प्रवीण काळजे 9687
सूर्यकांत चौधरी 843 (पराभुत)
मधुकर भोंडवे 9510
दिनेश मोहिते 9230
अनिल लोखंडे 9073
अरूण लिंभोरे 921 (पराभुत)

महिला राखीव गट

शुभांगी गायकवाड 9782
ताराबाई सोनवणे 8773
रूपाली दाभाडे 1475

इतर मागासवर्गीय गट

चेतन भुजबळ 9748
अरूण लिंभोरे 1143 पराभूत

अनुसूचित जाती जमाती गट

बाळासाहेब गायकवाड 9634
सखाराम गायकवाड 974

भटक्या विमुक्त गट

बाळकृष्ण कोळेकर 9415
शिवाजी कोळेकर 469 (पराभुत)
सुरेश जाधव 225 (पराभुत)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.