Wakad : अंडाभुर्जी न दिल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करत गैरवर्तन

एमपीसी न्यूज – अंडाभुर्जीची गाडी बंद करत असताना आलेल्या एका इसमाने अंडाभुर्जी मागितली. त्यावेळी हातगाडी बंद केली असल्याचे सांगणा-या महिलेला ग्राहकाने मारहाण केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. हा प्रकार रविवारी (दि. 16) रात्री साडेदहाच्या सुमारास आदित्य बिर्ला हॉस्पिटलसमोर थेरगाव येथे घडला.

आदित्य पेटकर (रा. भोई आळी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोर हातगाडीवर अंडाभुर्जी विकते. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी महिला हातगाडी बंद करत होत्या. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने महिलेकडे अंडाभुर्जी मागितली. ‘हातगाडी बंद केली आहे. तू उद्या ये’ असे फिर्यादी यांनी सांगितले असता आरोपीने महिलेला शिवीगाळ करत लाकडी बांबूने मारहाण केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग केला. महिलेच्या दुचाकीवर दगड मारून दुचाकीचे नुकसान केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.