Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मालती अभ्यंकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शिका श्रीमती मालती दामोदर अभ्यंकर (वय 89) यांचे मंगळवारी (दि. 18) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मालती अभ्यंकर यांच्या पार्थिवावर तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत मंगळवारी रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, व्यापार व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्योजक नंदकुमार अभ्यंकर व कलापिनीचे अध्यक्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक, तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य विनायक अभ्यंकर यांच्या त्या मातोश्री तर युवा उद्योजक केदार अभ्यंकर यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.