Vadgaon Maval : भूमिपुत्रांना रोजगार न देणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारणार- अॅड विजय पाळेकर

फिनोलेक्स केबल कंपनीत 15 हजारांची वेतनवाढ

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार न देणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असे प्रतिपादन शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड विजय पाळेकर यांनी केले. उर्से (ता.मावळ) येथील फिनोलेक्स केबल कंपनीत त्रैवार्षिक वेतनवाढ करार झाल्यानिमित्त सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी यतीन रेडकर, जितेंद्र मोरे, गुलाब मराठे, रवींद्र साठे, राजेंद्र पवार, रोहन आहेर, विजय कुलकर्णी, लक्ष्मण श्रीमानवार, विवेक सक्सेना, उद्योजक अशोक कारके, जालिंदर धामणकर, सुभाष धामणकर, बाळासाहेब धामणकर व शेकडो कामगार उपस्थित होते.

अॅड पाळेकर म्हणाले, ” फिनोलेक्स केबल कंपनीत गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर 15 हजारांची वेतनवाढ करण्यात आली. कंपनीत जिद्दीने व चिकाटीने काम केल्यावरच कामगारांचा विकास होईल. पण कामगारांवर अन्याय झाल्यावर संघटना सहन करणार नाही. कामगार कंपनीचा मुख्य बिंदू असून कामगार कायद्यांचे पालन कंपनी प्रशासनाने केले तर कामगार व प्रशासन प्रश्न उदभवणार नाही. त्यासाठी कामगार कायदे कामगारांच्या हिताचे झाल्याशिवाय कामगारांचे जीवनमान उंचावणार नाही. शिवक्रांती कामगार संघटना ही कामगारांची आहे. कान्हे येथील महिंद्रा कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलले जात असून त्यांच्या आंदोलनाकडे कुणाचे लक्ष दिसत नाही. पण त्यांच्यावर कंपनी अन्याय करत असेल तर तीव्र आंदोलन केल्याशिवाय शांत राहणार नाही”

यावेळी गुलाब मराठे, रवींद्र साठे, पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, भारत ठाकूर, प्रदीप धामणकर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कामगारांनी भंडारा उधळून डीजेच्या तालावर नाचून जल्लोष साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन युनियनचे अविनाश धामणकर, गणेश सुतार, सुभाष ठाकूर, भाऊ धामणकर, समीर कारके, शब्बीर मुलाणी, ज्ञानेश्वर कारके, राजाराम सावंत आदींनी केले.

प्रास्ताविक अविनाश धामणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महादेव वाघमार यांनी केले. आभार सुभाष ठाकूर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.