Pune : आता उद्योगांना मिळणार डिझेलची ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’

स्टार्टअपच्या माध्यमातून भारतात नवीन इंधन वितरण पद्धती सुरु

एमपीसी न्यूज- उदयोगांना लागणारे डिझेल आता त्यांच्या दरवाजात थेट उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने आता ही सेवा नवीन स्टार्टअपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची नवीन योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे इंधन विक्रीसाठी विद्यमान पेट्रोल पंपांसाठी मोठ्याप्रमाणात समांतर पर्याय खुले होणार आहेत. पुण्यात आदिती वाळुंज आणि चेतन वाळुंज या दाम्पत्याच्या रिपोस एनर्जी’ या नवीन स्टार्टअपला ही संधी मिळाली आहे.

न्यू गॅझेटच्या वृत्तानुसार अधिकृत स्टार्टअप्स आता स्वत: डिझेल ‘डोअरस्टेप्स डिलिव्हरी’ अर्थात घरपोच वितरणाच्या माध्यमातून करू शकणार आहेत. ज्यांच्याकडे हायस्पीड मोबाइल डिस्पेंसरची व्यवस्था आहे, यांच्याकडे अशा पद्धतीच्या डिलिव्हरीची परवानगी असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भारतात स्टार्टअप्सचा विकास जलदगतीने होईल असे तज्ज्ञांचे मत आहे.

रिपोस एनर्जी मागील दोन वर्षांपासून ही सेवा देत आहे. त्याचप्रमाणे भारतात मोठ्या प्रमाणात इंधन वितरण आणि ब्रँड व्हॅल्यू निर्माण करण्याच्या उद्देशाने ते विविध स्टार्टअप्ससोबत भागीदारी करण्यास तयार आहेत. या नवीन स्टार्टअप्सच्या माध्यमातून नवीन आणि सुरक्षित ग्रीड तयार करण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून इंधन पंप करण्यासाठी व वितरणासाठी एक व्यवस्था तयार करण्यात येईल, ज्यामुळे अवैध इंधन वितरण रोखले जाईल.

याबाबत माहिती देताना रेपॉस एनर्जीचे सह-संस्थापक चेतन वाळूंज म्हणाले, “या धोरणाचा प्रमुख उद्देश नवीन भारतात महत्वपूर्ण बदल घडवणे आहे. बेकायदेशीर इंधन वितरण थांबवणे आणि अधिकृत स्टार्टअप्सना इंधन वितरणासाठी प्रेरित करणे हे या धोरणाचे मुख्य उद्देश आहेत. यामुळे बेकायदेशीर वितरण नेटवर्क कोसळेल”

“नवीन इंधन स्टेशन्स देशभरात ठिकठिकाणी दिसत आहेत अशा परिस्थितीत अधिकृत स्टार्टअप्ससाठी इंधन वितरण क्षेत्रात विकास करण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. यामुळे ते तेल कंपन्यांकडून थेट तेल घेऊन विक्री करू शकतात.” असेही ते पुढे म्हणाले.

Aditi Walunj and Chetan Walunj
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like