Pimpri : मालमत्ता करवाढ व पाणीपट्टी दरवाढ मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन- सतीश कदम

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडकरांवर लादण्यात येणारा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करवाढीचा अन्यायकारक प्रस्ताव तातडीने मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी दिला आहे.

या संदर्भात सतीश कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे आगामी आर्थिक वर्षापासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करात वाढ होणार आहे. मालमत्ताकर वाढीचा फटका 2 लाख 54 हजार करदात्यांना, तर पाणीपट्टी दरवाढीचा फटका 1 लाख 10 हजार नळजोडधारकांना बसणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 2 लाख 54 हजार जुन्या मालमत्तांचे करयोग्यमूल्यांचे फेरमूल्यांकन करण्याचा आणि नवीन करयोग्य मूल्यानुसार मालमत्ताकर लागू करण्याचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तयार केला. त्यासाठी करयोग्यमूल्य पद्धत आणि भांडवलीमूल्य पद्धत अशा दोन पद्धतीचा पर्याय दिला. त्यानुसार निवासी मालमत्तांच्या करात दुपटीने ते तिपटीने वाढ होणार आहे.

आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातही जमेच्या बाजूला मालमत्ताकरात वाढ करण्यात येणार आहे. या दरवाढीस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा देऊ नये. प्रशासनाने हुकुमशाही पद्धतीने दरवाढ लागू करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा सतीश कदम यांनी दिला.

HB_POST_END_FTR-A2
You might also like