Viman Nagar : इंग्लंडच्या सिटी क्रिकेट क्लबची आनंद विद्या निकेतन हायस्कूलला 1 लाख 35 हजाराची मदत

एमपीसी न्यूज- लिस्टरशायर, इंग्लंडच्या सिटी क्रिकेट क्लबने विमाननगर येथील आनंद विद्या निकेतन हायस्कूलला भेट देऊन या शाळेच्या विविध उपक्रमासाठी 1 लाख 35 हजार रुपयांची देणगी दिली.

यावेळी लाॅरी सर,लिझा मॅम,आशुतोष व क्लबचे खेळाडू व त्यांच्या पालक उपस्थित होते. शाळेच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. सर्वांनी शाळेची पहाणी करून शाळां, संस्था, शिक्षक विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रत्यक्ष वर्गात जाऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली.

या क्लबच्या वतीने शाळेच्या विकासासाठी रू.1 लाख 35 हजार रुपयांची भरघोस मदत देण्यात आली. या देणगीचा स्वीकार मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला. संस्थेच्या कार्यवाह श्रीमती तावरे यांनी सर्वांचे आभार मानले. अतुल गायकवाड, आशुतोष व डाॅन भागवती व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.