Pimpri : सदानंदन मास्टर यांना यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

एमपीसी न्यूज – निगडी-प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने केरळमधील स्वयंसेवक सदानंदन मास्टर यांना यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन सेवाप्रकल्प, धर्मरक्षण, राष्ट्रहित, शौर्य आदी क्षेत्रांत भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने दरवर्षी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. याबाबतची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी दिली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मरणदिनी म्हणजेच बुधवारी (दि. 26) निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सायंकाळी सहा वाजता पुरस्कार वितरण होणार आहे. उद्योजक श्रीकांत बडवे यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन सेवाप्रकल्प, धर्मरक्षण, राष्ट्रहित, शौर्य आदी क्षेत्रांत भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने दरवर्षी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. पुरस्काराचे हे तेरावे वर्ष असून यापूर्वी अरुणाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, दिल्ली, बिहार, गुजरात, राजस्थान, ओरिसा, तमिळनाडू, कर्नाटक आदी राज्यातील व्यक्ती अथवा संस्थांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रुपये एक लाख राष्ट्रीय पुरस्कार; तर रुपये एक्कावन्न हजार राज्यस्तरीय पुरस्कार असे दोन पुरस्कार प्रदान केले जातात.

_MPC_DIR_MPU_II

यावर्षी मंडळाच्या निवड समितीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी केरळ येथील सदानंदन मास्टर आणि राज्यस्तरीय पुरस्कारासाठी गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या जनसंघर्ष समितीची निवड केली आहे. यानिमित्ताने संस्कार भारती (पिंपरी-चिंचवड) निर्मित ‘अनंत मी – अवध्य मी’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रावर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1