Mulshi : नेरेगावाला अखेर मिळाला नवीन डीपी व ट्रान्सफॉर्मर

वंदे मातरम शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – वंदे मातरम शेतकरी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून मुळशी तालुक्यातील नेरेगावात जीर्ण झालेला डीपी व ट्रान्सफॉर्मर बदलून नवीन उभारण्यात आलेला आहे. या नवीन डीपी चे उद्घाटन वंदे मातरम शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी महावितरणचे कर्मचारी बुधले, गायकवाड, वावरे, व्ही.एम. फड, तसेच ग्रामस्थ रामभाऊ पायगुडे, बाळासाहेब पायगुडे, सौरभ पायगुडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

नेरे गावातील जीर्ण झालेला डीपी व मोडकळीस आलेला विद्युत खांब व तारा बदलाव्यात याबाबत वंदे मातरम शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांच्याकडून महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते. तसेच नेरे गावातील जीर्ण झालेली डीपी व ट्रान्सफॉर्मर बदलून नवीन उभारण्यात यावा याबद्दल संघटनेकडून सतत पाठपुरावा करण्यात आला. अखेर संघटनेच्या प्रयत्नांना यश मिळाले असून महावितरणतर्फे नेरे गावात नवीन डीपी व ट्रान्सफॉर्मेर उभारण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.