Wakad : कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थिनीचा विनयभंग; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथील इंदिरा कॉलेजमध्ये घडली.

शरद अशोक पवार (वय 30), प्रवीण शिवाजी पवार (वय 30, दोघेही रा. जीवननगर, ताथवडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 18 वर्षीय विद्यार्थिनीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपी एम एच 14 / एफ एस 3522 या मोटारीतून आले. त्यांनी आपसांत संगनमत करून फिर्यादी तरुणीचा इंदिरा कॉलेजच्या प्रवेशद्वारावर व आतमध्ये जाऊन विनयभंग केला. तसेच फिर्यादी आणि तिच्या मैत्रिणीला अश्‍लील शब्दात बोलून मनास लज्जा निर्माण केली. आरोपींना रोखण्यासाठी आलेल्या फिर्यादी तरुणीच्या मित्राला देखील शिवीगाळ करीत धक्‍काबुक्‍की केली. पोलीस उपनिरीक्षक अंगज याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like