Chinchwad : पादचारी महिलेचे दीड लाखाचे सोन्याचे गंठण व मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि मंगळसूत्र असे दीड लाख रुपयांचे सोने दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री नऊ वाजता दळवीनगर चिंचवड येथे घडली.

शैला गोविंद उत्तेकर (वय 57, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तेकर या सोमवारी रात्री नऊ वाजता चिंचवड मधील दळवीनगर चौकाजवळ रस्त्याने पायी चालत जात होत्या. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 35 ग्रॅमचे सोन्याचे गंठण आणि 15 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण दीड लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.