Pune : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सादर केला 7 हजार 390 कोटींचा अर्थसंकल्प

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे 2020- 21 या आर्थिक वर्षासाठीचा 7 हजार 390 कोटीचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज, बुधवारी सादर केला.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआय (आठवले गट) च्या गटनेत्या सुनीता वाडेकर, एमआयएमच्या गटनेत्या अश्विनी लांडगे उपस्थित होत्या.

पुणे महापालिकेचे बजेट 10 हजार कोटींपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला. महसूल वाढीसाठी महसूल कक्षही स्थापन करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पातील ठळक बाबी :

# पुणे महापालिकेची भव्य शिवसृष्टी, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, भामा – आसखेड प्रकल्प, स्मार्ट व्हिलेज, मेट्रो डीपीआर, आशा अनेक प्रकलपंचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे.

# लालमहाल ते फडगेट पोलीस चौकीपर्यंत ग्रेड सेपरेटर तयार करणे, यासाठी चार कोटी तरतूद.

# येरवडा येथील ब्रेमेन चौक परिसरात ट्रॅफिक पार्क उभारणे.

# डेक्कन ते पूल गेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गांवरील 32 आसनी मिनी बसच्या दिवसभराच्या प्रवासासाठी 10 रुपये आकारणी.

# पुणे शहरातील प्रत्येक भागात योगा केंद्र उभारणे, त्यासाठी 95 लाख रूपयांची विशेष तरतूद.

# शहराचा कचरा जिरवण्यासाठी भूगाव – बावधन येथे 2 एकर जागा उपलब्ध.

# सारसबाग आणि पेशवे पार्क या दोन्ही उद्यानाची मिळून 32 एकर असून, या भागात मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटींची विशेष तरतूद.

# 50 वाहनतळांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारले जाणार, या कामासाठी एक कोटी रुपयांची विशेष तरतूद.

# चांदणी चौकात शिवसृष्टी उभारण्यास 26 कोटींची विशेष तरतूद.

तुळशी बाग परिसरात प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी वॉकिंग प्लाझा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.