India Corona Update : गेल्या 24 तासांत 13,965 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर   

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 13 हजार 965 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 04 लाख 23 हजार 125 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात कोरोना रिकव्हरी रेट 96.99 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 13 हजार 052 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 127 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 07 लाख 46 हजार 183 एवढी झाली आहे. सध्या देशात 1 लाख 68 हजार 784 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 19 कोटी 65 लाख 88 हजार 372 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 50 हजार 964 नमून्यांची तपासणी शनिवारी (दि.30) करण्यात आली आहे.

 

गेल्या 24 तासांत देशभरात 127 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 54 हजार 274 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत 37 लाख 44 हजार 334 जणांचे लसीकरण झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.