Pavana Dam : धरणातून 1400 क्युसेकने विसर्ग; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – पवना धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.धरणातील एकूण पाणीसाठा 95.80 टक्क्यांवर पोहोचला आहे.त्यामुळे  सध्या  विद्युत र्निमिती गृहाद्वारे 1400 क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याच्या येवा-चे प्रमाण पाहुन रात्री 10 वाजता धरणाच्या सांडव्याद्वारे 2000 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण परिसरात 1 जूनपासून 1 हजार 955 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे झपाट्याने धरणातील पाणीसाठा वाढला. चार दिवसात 15 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. दिवसभरात 5 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली.  त्यामुळे धरणातील पाणीसाठा 95.80 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सध्या  विद्युत र्निमिती गृहाद्वारे 1400 क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे. धरणाच्या पाणलाेट क्षेत्रातुन येणारा पाण्याचा येवा चे प्रमाण पाहुन रात्री 10 वाजता धरणाच्या सांडव्या द्वारे 2 हजार क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे. त्यामुळे धरणाच्या खालील बाजूकडील नदी तिरावरील गावांमधील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी. नदी पात्रात व लगत असलेली सर्व साधन सामुग्री व जनावरे सुरक्षित ठीकाणी हलविण्यात यावीत. जेणे करून कुठल्याही प्रकारची वित्त व जिवीत हानी होणार नाही याची दक्षता घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.