Pimpri : पवना धरण परिसरात 124 मिमी पाऊस; धरणात 63 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविण्या-या पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून  गेल्या 24  तासात 124  मिमी पाऊस पडला आहे. तर,  पाणीसाठ्यात   6.78 टक्यांनी वाढ झाली आहे. आजमितीला धरणात 63.16 टक्के पाणीसाठा झाला आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. आजमितीला धरणात 63.16 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात धरण पाणलोट क्षेत्रात 124 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात 6.78  टक्यांनी वाढ झाली आहे. तर, 1 जूनपासून 1556 मिमी पाऊस झाला असून 39.80 टक्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.  आजमितीला धरणात 63.16 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत पवना धरण परिसरात 1519 मिमी पाऊस झाला होता. तर, धरणात 58.83 टक्के पाणीसाठा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.