Pune News : पोलिस दलातील 144 पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोना बाधित

एमपीसी न्यूज : कोरोना आजाराचा संसर्ग वाढत असल्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.

त्यामुळे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिस दलातील 144 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सध्या कोरोनाची लागण झाली असून ते यावर उपचार घेत आहेत.

मधल्या काळात एका दिवसाला तीन ते चार पोलिसांना लागण होत असल्याचे उघड झाले होते. परंतु मागील काही दिवसांपासून हे प्रमाण पुन्हा वाढले असून दिवसाला 15 कर्मचाऱ्यांना कोरोना ची बाधा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत पुणे पोलीस दलातील 1475 जणांना कोरोना ची बाधा झाली आहे. यातील बहुतांश कर्मचारी हे उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर बारा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सद्यस्थितीत पुणे पोलीस दलातील 144 अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर हॉस्पिटल आणि घरी उपचार सुरू आहे. पोलिस दलात कोरोना चे प्रमाण वाढल्याने आता पुन्हा एकदा हॉस्पिटल मधील काही बेड राखीव ठेवण्यात येत आहेत.

लसीकरण सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलिसांना लसीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहर पोलीस दलातील 95 टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 85 टक्के पोलिसांनी पहिला डोस घेतला तर दहा टक्के पोलिसांनी 2 डोस घेतले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.