Pimpri : श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १४५ जणांचा सहभाग   

एमपीसी न्यूज –  आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व अध्यात्मिक गुरु परम पूज्य गुरुजी श्री श्री रवीशंकरजी यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल व अभिषेक इंटरनॅशनल स्कूल संतनगर मोशी येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या दोन्ही  ठिकाणी मिळून १४५ साधकांनी रक्तदान केले. यावेळी आनंद अनूभुती शिबिर, सत्संग व समूह सुदर्शन क्रिया तसेच स्नेहवन संस्थेतील मुलांना व रुपीनगरच्या किनारा वृद्धआश्रमात किराणा सामान, अन्नधान्य व इतर सामानाचे साधकांकडून दान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ लिविंगच्या नाॅव्हेल, भोसरी व मोशीच्या केंद्राकडून करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.