Pimpri Corona Update : शहरात आज 146 नवीन रुग्णांची नोंद; 178 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध भागातील 146 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 178 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 67 हजार 274 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 95 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 77 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

 

Lonavala News : लोणावळा शहरात ओबीसीच्या चार जागा कमी झाल्याने नाराजी

 

 

तर, 18 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 2 हजार 989 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 10 हजार 800 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.