Pimpri Corona Update : शहरात आज 147 नवीन रुग्णांची नोंद; 212 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध भागातील 147 नवीन कोरोना (Pimpri Corona) बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 212 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 67 हजार 421 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 30 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 11 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 19 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये (Pimpri Corona) दाखल आहे. आज दिवसभरात 2 हजार 189 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 12 हजार 989 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.