बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

पुणे लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले तब्बल 15.5 किलो सोन्याचे दागिने

एमपीसी न्यूज – पुणे लोहमार्ग पोलिसांनी चेन्नई कुर्ला एक्सप्रेस गाडीतून प्रवास करणा-या दोघा व्यक्तींकडून तब्बल तब्बल 15 किलो 650 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. ही कारवाई सोमवारी (दि. 6) दुपारी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या दागिन्यांची किंमत 4 कोटी 38 लाख रुपये इतकी आहे.

याप्रकरणी सुमेर मुकन सिंह (वय-32, रा.राजस्थान) आणि हरिओम पुरुषोत्तम पारीक (वय-30, रा. राजस्थान) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. या दोघांजवळ संबंधित दागिन्यांचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याने सीआरपीसी कलम 102 प्रमाणे दागिन्यांचा पंचनामा करून ताब्यात घेतले आहेत. मूळ सोनेमालकास बोलावण्यात आले असून त्यांनी हे सोने कुठून आणले आणि कुठे घेऊन जाणार असल्याबाबत चौकशी सुरू आहे.

spot_img
Latest news
Related news