Pune : एम्प्रेस गार्डनजवळ 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

पुणे कस्टम नार्कोटिक्स विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – हडपसर येथील एम्प्रेस गार्डनजवळ 106 किलोचा 15 लाख रुपयांचा गांजा पकडण्यात आला. तसेच दोघांना अटक करण्यात आली. पुणे कस्टम नार्कोटिक्स विभागाने ही कारवाई केली.

रोहित विष्णू काळे, (खर्डा, जामखेड), सिद्धार्थ बबन नन्नावरे (पंढरपूर, सोलापूर), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित व सिद्धार्थ दोघेही एमएच 16 बीएच 9344 ही गाडी घेऊन शुक्रवारी (7) हडपसर येथून एम्प्रेस गार्डन जवळून जात होती. यावेळी संशय आल्याने गाडी थांबवण्यात आली. गाडीत तपास केला असता 106 किलोचा गांजा आढळला. हा गांजा नवी मुंबईतील एका ग्राहकाला विकण्यासाठी नेण्यात येत होता. हा 15 किलोंचा गांजा आणि 6 लाखांची गाडी जप्त करण्यात आली.

रोहित व सिद्धार्थ या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंतची कोठडी देण्यात आली.

कस्टम नार्कोटिक्स विभागाने गेल्या 6 महिन्यात आतापर्यंत 1.4 करोडचे ड्रग्ज जप्त केले आहेत. तर 30 लाख रुपयांच्या गाड्या जप्त करून आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आले आहे. त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून ते सध्या येरवाडा कारागृहात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.