Pune : वाहन तोडफोडीचे सत्र काही थांबेना….

चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 ते 20 गाड्यांची तोडफोड

एमपीसी न्यूज – शहरात वाहन तोडफोडीचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल शनिवारी रात्री 15 ते 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कस्तूरबा वसाहत येथे शनिवारी रात्री वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये दुचाकी, रिक्षा, चारचाकी, हातगाडी आदी वाहनांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.