Bunty Aur Babli: बंटी, बबलीच्या कारनाम्याची पंधरा वर्षे पूर्ण

15 year completed for bunty aur babli movie amitabh bachchan shared memory

एमपीसी न्यूज- लोकांना गंडा घालत फिरणाऱ्या जोडगोळीला पोलिसी भाषेत आजही बंटी आणि बबली म्हटले जाते. ज्या ‘बंटी आणि बबली’ चित्रपटावरुन हे संबोधन पडले त्या बंटी और बबली चित्रपटाच्या प्रदर्शनाला दि. 27 मे रोजी पंधरा वर्षे पूर्ण झाली.

यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तसेच ऐश्वर्या रायनेही या चित्रपटातील ‘कजरा रे’ गाण्यात खास भूमिका साकारली होती. त्या निमित्ताने बिग बींनी सोशल मीडियावर या चित्रपटाची आठवण काढत सांगितले की, मुलगा अभिषेकसोबतचा त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता.

अमिताभ यांनी ‘बंटी और बबली’ चे एक पोस्टर आणि अभिषेक- ऐश्वर्यासोबतचा स्टेज शोचा परफॉर्मन्सचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “15 वर्षे… बंटी और बबली… अभिषेकसोबतचा माझा पहिला चित्रपट… खूप मजा केली… आणि काय टीम होती… आणि ‘कजरा रे’… आमच्या सर्व स्टेज शोमध्ये याचे सादरीकरण व्हायचे.”


2005 मध्ये झाला होता रिलीज

शाद अली दिग्दर्शित हा चित्रपट दि. 27 मे 2005 रोजी प्रदर्शित झाला होता. लोकांना फसवत फिरणाऱ्या बंटी (अभिषेक बच्चन) आणि बबली (राणी मुखर्जी) या दोन चोरांभोवती या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. या चित्रपटात अमिताभ यांनी डीसीपी दशरथ सिंहची भूमिका साकारली होती, ज्यांच्यावर बंटी आणि बबली यांना पकडण्याची जबाबदारी असते. ‘बंटी और बबली’ व्यतिरिक्त अमिताभ आणि अभिषेक यांनी ‘सरकार’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘पा’ सारख्या चित्रपटांमध्ये स्क्रिन शेअर केली.

विशेष म्हणजे ‘बंटी और बबली’चा सिक्वेलही जवळपास पूर्ण झाला आहे. मात्र यात अभिषेकऐवजी सैफ अली खान बंटीची भूमिका साकारत आहे. वरुण व्ही. शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी, अक्षय कुमार आणि शरबरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like