Bhosari Crime News : लग्नाचे अमिश दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

एमपीसी न्यूज – लग्नाचे अमिश दाखवून 19 वर्षीय तरुणाने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जून ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एमआयडीसी भोसरी परिसरात घडली.

कैलास शहाजी पाटोळे (वय 19, रा. एमआयडीसी भोसरी) याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 15 वर्षीय मुलीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्याशी जवळीक साधली. आरोपीने त्याच्या दुचाकीवरून नेऊन पीडित मुलीला त्याच्या घरी आणि एच ए कॉलनीच्या पाठीमागील गेटजवळ खोलीत नेऊन तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला. पीडित मुलगी यामुळे गरोदर राहिली. हा प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास येताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.