Moshi Crime News : लेबर कॅम्प मधून 15 वर्षीय मुलगी बेपत्ता

एमपीसी न्यूज – बो-हाडेवाडी मोशी येथील विनायक नगर, लेबर कॅम्प मधून 15 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली असून अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा तिच्या नातेवाईकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.

राखी मुकेश सिंग (वय 15) असे बेपत्ता मुलीचे नाव आहे. अंगाने मध्यम, रंग गोरा, उंची पाच फूट चार इंच, नाक सरळ, चेहरा उभट, केस काळे, एक वेणी घालते, अंगात गुलाबी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज व लाल रंगाची ओढणी, पायात काळ्या रंगाची चप्पल अशी वेशभूषा असलेली, हिंदी, मराठी भाषा बोलते. तिच्याजवळ मौल्यवान चीजवस्तू अथवा पैसे नाहीत.

राखी सिंग हिला अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी अमिश दाखवून तिच्या पालकांच्या ताब्यातून पळवून नेले असल्याचा तिच्या पालकांना संशय आहे. दरम्यान, वरील वर्णनाच्या मुलीबाबत माहिती मिळाल्यास एमआयडीसी भोसरी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.