बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेविषयी निवडणूक विभागाकडे 150 तक्रारी

फेर निवडणूक घेण्याची मागणी

एमपीसी न्यूज –  महापालिकेच्या निवडणूका संपून केवळ 11 दिवस झाले आहेत. मात्र, या कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाकडे 150 तक्रारी आल्या आहेत.

यावर्षी मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात चार उमेदवार निवडून देणे बंधनकाराक होते. त्यानुसार निवडणुका झाल्या ख-या, मात्र पराभूत उमेदवरांनी थेट निवडणूक प्रक्रिया, इव्हीएम मशीनमध्येच गोंधळ असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मध्यंतरी पुण्यात इव्हीमशीनचेच दहनही करण्यात आले.

त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडेही 150 तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये पराभूत उमेदवारांनी  केलेल्या तक्रारी आहेत. यामध्ये इव्हीएम मशीनमध्ये गोंधळ, चौकशीसाठी त्या सील करून ठेवाव्यात, उमेदवरांच्या नामनिर्देशनपत्राची माहिती द्या, बुथवाईज माहिती द्या, फेर निवडणूक घ्या अशा स्वरुपाच्या आहेत, अशी माहिती  निवडणूक अधिकारी प्रवीण अष्टीकर यांनी दिली.

याविषयी काही तक्रारदार उच्च न्यालयातही जाणार आहेत. मात्र, प्रशासनाच्या मते इव्हीएम मशीनमध्ये कोणताही गोंधळ होणे शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे.

spot_img
Latest news
Related news