Health Camp : आरोग्यवर्धिनी चिकित्सालयातर्फे आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचा 150 पोलिसांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज : लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम (Lions Club of Pune Supreme) व आरोग्यवर्धिनी चिकित्सालय (Arogyavardhini Chikitsalay) यांच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात 150 पेक्षा अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. शिवाजीनगर पोलीस रुग्णालयात नेत्र आश्चोतन, नेत्रतर्पण, केश व त्वचा विकार परिक्षण आणि अग्नी व विद्धकर्म असे सर्वांगीण आरोग्य सेवा शिबीर खास पोलिस वाहनचालक, कर्मचारी व अधिकारी वर्गासाठी आयोजित केले होते.

Inaugration of Smart Toilet : जगताप डेअरी चौकातील ‘स्मार्ट टॉयलेट’चे प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते लोकार्पण

डॉ. हरीश पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने हे आरोग्य शिबीर यशस्वी केले. त्यामध्ये डॉ. स्नेहल पाटणकर, डॉ. निलेश ढवळे, डॉ. स्वप्नील भाकरे, डॉ. अंकित झाडे, डॉ. राधा सानप आदींचा सहभाग होता. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष शैलेश बुरसे, सेक्रेटरी विजय सप्रे, पोलिस निरीक्षक बावसकर साहेब, समन्वयक अमोल क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. हरीश पाटणकर म्हणाले, “पोलिसांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्यवर्धिनी चिकित्सालय सदैव तत्पर असते. आजवर आरोग्य शिबीर, नेत्रतर्पण शिबीरामार्फत 6500 हुन अधिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा करता आली, याचे समाधान वाटते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.